कोकणमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
दिवाणखवटी स्टेशनजवळ बोगद्यात ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरू

खेड : कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवाणखवटी स्टेशन जवळ बोगद्यात ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मत्स्यगंधा एक्सप्रेस रोहा स्थानकात थांबवली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.



