मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

लांजा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

लांजा : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत देवधे येथील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, माझी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, तालुका संघटक प्रसाद माने, उपतालुकाप्रमुख सुजित आंबेकर, उप तालुकासंघटक चेतन खंदारे, आर. डी. सी. बँक संचालक मुन्ना खामकर, विभागप्रमुख महेश गुरव, दशरथ गुरव उपस्थित होते.

लांजा तालुक्यातील देवधे दळवीवाडी येथील ग्रामस्थांनी, आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा दळवी वाडी रस्ता पूर्ण होईल, असा विश्वास दर्शवत देवधे दळवी वाडीतील परशुराम दळवी, चंद्रकांत दळवी, राजाराम दळवी, प्रकाश दळवी, आनंदा दळवी, मनोहर दळवी, ऊदय दळवी, मधुकर दळवी, मनोहर दळवी, मोहन दळवी, महेश दळवी, संतोष दळवी, राकेश दळवी, किशोर दळवी, अनिकेत दळवी, विनायक दळवीसह अनेक महिला व ग्रामस्थांनी प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!