एसआरके तायक्वांदो संस्थेचे नवीन कार्यकारणी जाहीर
अमोल सावंत यांची अध्यक्षपदी, तर वीरेश मयेकर यांची उपाध्यक्षपदी निवड

रत्नागिरी : एस आर के तायक्वांदो संस्थेच्या नवीन कार्यकारिणीसाठी २४ मार्च रोजी निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी अमोल रमेश सावंत, उपाध्यक्षपदी वीरेश प्रभाकर मयेकर, सचिवपदी शीतल मधुकर खामकर, कोषाध्यक्षपदी अंजली अमोल सावंत तर निखिल नंदकुमार सावंत, प्रफुल्ल चंद्रकांत हातिसकर, शाहरुख निसार शेख यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.
या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण व्यंकटराव करा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत, प्रशांत मकवाना यांनी संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



