एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात एस. एम. जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

रत्नागिरी : थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील एस. एम. जोशी विद्यानिकेतन शैक्षणिक परिसरातील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या एस. एम. जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आज (१ एप्रिल) अभिवादन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांच्या हस्ते एस. एम. जोशी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी एस. एम. जोशी यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला. तसेच एस. एम. जोशी यांचे नाव आपल्या शैक्षणिक संकुलाला असून त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याविषयीजाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
प्रा. पौर्णिमा सरदेसाई यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमांस महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



