मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दापोलीत अग्नितांडव; पाच दुकानांचे लाखोंचे नुकसान

दापोली : शहर बाजारपेठेत हॉटेल सन्मान समोर बिपिन कॉर्नरला रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मोबाईल शॉपी ज्वेलरी आदी एकूण एकूण पाच दुकानांचं मोठं लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शहर शिवसेना शाखेजवळ असलेल्या काहींच्या दुकानातून येणारा धूर पाहून हा सगळा प्रकार लक्षात आला. शहर शिवसेना शाखेजवळील युवकांनी नागरिकांनी सतर्कता बाळगत तात्काळ मदत कार्य सुरू केले. त्यावेळी शहर बाजारपेठ येथील श्री पंचमुखी मारुती मंदिराच्या कार्यक्रमासाठी योगायोगाने उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे यांनी तात्काळ नगरपंचायत कार्यालयात जाऊन फायर बुलेट घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले.

धोपट पाणीवाले, श्री. संदीप, दिनेश नायक, नितीन शिंदे, अपी मोरे आदी नागरिकांनी आग विझवण्यासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था केली. नगरपंचायतीच्या फायर बुलेटला पाणी पुरवण्याचे मोठे काम माजी सरपंच दिनेश नायक यांनी केले.

शहर बाजारपेठेतील नागरिकांनी युवकांनी धाडस दाखवून घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन तात्काळ मदत कार्य सुरू केल्याने आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दापोली नगरपंचायत प्रशासनाकडे अग्निशामक बंब नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली. अखेर खेड नगरपालिकेकडून अग्निशमक बंब बोलावण्यात आला. मात्र खेड येथून अग्निशामक बंब येईपर्यंत दापोली शहर परिसर व बाजारपेठेतील युवकांच्या नागरिकांच्या मोठ्या तात्काळ मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आले. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र या भीषण आगीत सुमारे पाच दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नगरपंचायत कर्मचारी महसूल कर्मचारी व पोलिसांनीही धाव घेतली.

दरम्यान, दापोली नगरपंचायतीच्या कर्मचारी अमित रेमजे या कर्मचाऱ्याने तो बाजारपेठेतच योगयोगाने मारुती मंदिरात बाजारपेठेतच असल्याने त्यांन तात्काळ सतर्कता बाळगत नगरपंचायत कार्यालयात जाऊन तात्काळ फायर बुलेट घटनास्थळी आणून खूप मोठी मदत केली. विशेष म्हणजे फायर बुलेट चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी केलेले धाडस मोठे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!