मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कौंढर काळसूर गावात सात वाड्यांमध्ये शेती फवारणी पंपांचे मोफत वाटप

मनसेचे सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी व मनसे कौंढर काळसूर शाखेचा स्तुत्य उपक्रम

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे सह.संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांच्या व कौंढर काळसूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तालुका गुहागरच्या वतीने संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कौंढर काळसूर गावातील सात वाड्यांमध्ये सात शेती फवारणी पंपांचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी मनसेचे शाखाध्यक्ष सुनील मूकनाक, सामाजिक कार्यकर्ते मंदार जोशी, उपाध्यक्ष विलास शितप, विकास जोयशी, ग्रामपंचायत सदस्य सचिन जोयशी, वर्षा शितप, रजनी कदम, किशोर बामणे, सीताराम खांडेकर, रमेश जोयशी, तुकाराम जोयशी, महेंद्र मूकनाक, विलास जोयशी यांच्या नेतृत्वाखाली कौंढर काळसूर गावातील सात वाड्यात सात शेती फवारणी पंपांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

यावेळी मनसे तालुका गुहागर पक्षाचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक धार्मिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा गौरव करून प्रमोद गांधी यांना निरोगी दीर्घयुष्य लाभो, अशा मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. मनसेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!