कुठेतरी अचकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही
भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर

आबलोली (संदेश कदम) : “आमचे नेतृत्व हे शांत संयमी आहे. कुठेतरी आजकट विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही, असा टोला भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी गुहागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत कुणाचेही नाव न घेता लगावला.
भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर म्हणाले की, “आमच्या नेत्यावर काहीही आरोप केले जातात. आता आरोप करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. काही दिवसांपूर्वी वेळणेश्वर गटात झालेल्या स्थित्यंतराचा याचा राग येऊन काहीतरी बोलायचं .आमच्या अंतर्गत बाबी असतील. त्याला त्याच स्तरावर उत्तरे दिली जातील; परंतु उगाचच आपल्या बुडाला काहीतरी आग लागलेय आणि ती दाखवू नये म्हणून आमच्या नेत्याबद्दल काहीतरी बोलायचं हे आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशाराही तालुका अध्यक्ष भाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, अध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण तालुका अध्यक्ष उदय घाग, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष विनायक सुर्वे, आशिष विचारे, प्रांजली कचरेकर, अपूर्वा बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, श्रीकांत मोरे, विजय मसुरकर, रवी अवेरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.


