मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पा कदम, माजी सरपंच महेंद्र कदम, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, माजी सभापती आणि ग्रामपंचायत सदस्या सौ. वृषाली वैद्य, संजय कदम, श्री. शिर्के, आशा स्वयंसेविका सौ. विशाखा कदम, निखिल सुर्वे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!