मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आयएएस अधिकारी होण्याचे समृद्धी आंबेकरचे स्वप्न

आबलोली (संदेश कदम) : आई – वडिलांच्या आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिद्दीने आणि प्रचंड परिश्रम घेऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे वाघांबे (ता. गुहागर) गावची सुकन्या आणि पाटपन्हाळे हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी सुरेश आंबेकर हिने व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत समृद्धी आंबेकर हिने ९९.२० टक्के मिळवून गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धीच्या या यशाबद्दल तालुक्यातील सर्वच स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे. समृद्धीच्या या यशाबद्दल आमच्या प्रतिनिधीने तिचे अभिनंदन करून तिच्याशी संवाद साधला असता आई वडील आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

यावेळी तिने आपल्या अभ्यासाचा दिनक्रम सांगतानाच प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर पेपर छान लिहिता येतो, वेळेचे नियोजन करा आणि फक्त त्यात छोटे मोठे बदल करा आई-वडिल आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध अभ्यास करा यश निश्चित मिळेल, असा संदेशही तिने यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!