मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

“एक कुटुंब- एक गणपती- एक गोतावळा २०२५”या अनोख्या छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

सुवर्णा महादेव फाउंडेशनतर्फे गोतावळ्यातील कुटुंबांसाठी खास स्पर्धा

गुहागर : गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, आनंद, पारंपरिक सजावट आणि नातेवाईकांची गजबज. याच उत्सवात घरगुती गणपती व एकत्र कुटुंबव्यवस्थेचा महत्त्वाचा संदर्भ लक्षात घेऊन सुवर्णा महादेव फाउंडेशनने (महाराष्ट्र राज्य) “एक कुटुंब – एक गणपती – एक गोतावळा छायाचित्र स्पर्धा २०२५” या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे घरगुती गणपती बाप्पाच्या सान्निध्यात संपूर्ण कुटुंब एकत्र आल्याने निर्माण होणाऱ्या सौंदर्यपूर्ण आणि आत्मीय क्षणांचे जतन करणे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पासोबत घरातील सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो पाठवायचा आहे. ही स्पर्धा खेडेकर गोतावळ्यातील प्रत्येक कुटुंबासाठी खुली आहे. स्पर्धेचा हेतू कौटुंबिक एकतेचा सण म्हणून गणेशोत्सव साजरा करणे आणि प्रत्येक घरातील आनंदाचे क्षण पुस्तकरूपी संचित करून त्यांचा गौरव करणे.

स्पर्धेसाठी फक्त एकच छायाचित्र ग्राह्य धरले जाईल. प्रोफेशनल फोटोग्राफीची गरज नाही; मोबाईल कॅमेराद्वारे काढलेले फोटो मान्य असतील; मात्र मोबाईल आडवा (लँडस्केप मोड) धरून छायाचित्र काढणे बंधनकारक आहे. या स्पर्धेसाठी पारंपरिक पोशाख असले तर उत्तम, मात्र बंधनकारक नाही.

स्पर्धेतील विजेत्यांना “एक बाप्पा – एक गोतावळा २०२५” या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी कुटुंबाला सन्मानचिन्ह स्वरूपात प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. स्पर्धेसाठी फोटो पाठविण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ असून, छायाचित्र पाठविण्यासाठी गुगल फॉर्म https://forms.gle/CA5aBxunxhuJwFtG9 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 7030557042 वर पाठवायचे आहेत. ‘सुवर्णा महादेव फाउंडेशन’तर्फे खेडेकर गोतावळ्यातील सर्व कुटुंबांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपल्या घरातील गणेशोत्सवाचे सौंदर्य, संस्कृती आणि कुटुंबातील स्नेह वृद्धिंगत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!