मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा शिवसेना लांजा तालुक्यांने केला जाहीर निषेध

गुन्हा दाखल करण्यासाठी लांजा पोलीस ठाणे यांना दिले निवेदन

लांजा : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबई येथील कॉमेडियन शो दरम्यान शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका गाण्याद्वारे आक्षेपार्ह शब्द वापरून जी बदनामी केली आहे, त्यामुळे लांजा तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आम्हा शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान आहे. आमच्या नेत्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेली बदनामी आम्ही शिवसैनिक खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा लांजा तालुका शिवसेनेने दिला आहे.

कामरा याने केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही शिवसैनिक जाहीर निषेध व्यक्त करून असून, आमच्या नेत्यांच्या बदनामी विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नीलकंठ बगळे- पोलीस निरीक्षक -लांजा पोलीस ठाणे यांचेकडे लांजा तालुका शिवसेना यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जि प माजी अध्यक्ष जगदीश राजापकर, शहर प्रमुख सचिन डोंगरकर, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, तालुका संघटक शिव उद्योग सेना दीपक कदम, विभागप्रमुख संतोष साटले, उपशहर प्रमुख प्रवीण जेधे, उपविभागप्रमुख प्रवीण शिखरे, विभागप्रमुख किरण शेरे, सरपंच संघटना अध्यक्ष परेश खानविलकर, संदीप दळवी, उपसरपंच गौरी शेट्ये, उपतालुकाप्रमुख संतोष रेवाळे, माजी नगराध्यक्ष संपदा वाघधरे, माजी सभापती दीपाली साळवी, सोनू पाटील, कैलास खानविलकर आदी अनेक शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!