मुख्य बातमी
रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पदोन्नतीने बदली

रत्नागिरी : नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तुषार बाबर यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते नेमके कोणत्या ठिकाणी रुजू होणार हे स्पष्ट झालेले नाही.
तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी तुषार बाबर यांनी सांभाळली. मुख्याधिकारी म्हणून काही काळ लांजा, राजापूर येथेही कामकाज पाहिले. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नगरपालिकेचा कारभार त्यांनी प्रभारी म्हणून चांगला सांभाळला.



