मुख्य बातमी

कोतवडे गावची ग्रामदेवी श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला ८ मेपासून प्रारंभ

९ मे रोजी संतांच्या उपस्थितीत कलशारोहण 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे गावची स्वयंभू आणि जागृत ग्रामदेवी श्री महालक्ष्मीमातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा ८ ते १० मे या कालावधीत साजरा होणार आहे. विश्वस्त आणि समस्त ग्रामस्थ यांच्या समन्वयाने या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या कलशारोहणाचा मुख्य सोहळा परमहंस परिव्राजकाचार्य सद्‌गुरु श्री नृसिंह आश्रमाचे पू. स्वामी श्री दंडी महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत ९ मे रोजी होणार आहे.

८ में था दिवशी या जीर्णोद्धार सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत संप्रोक्षणविधी, दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत कळशाची मिरवणूक, सायंकाळी ६ ते रात्री १० राक्षोघ्नयाग, रात्री १० नंतर भजन असे कार्यक्रम होणार आहेत. ९ मे रोजी सकाळी ७ ते ११ यावेळेत वास्तू शांती, सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत कलशारोहण, दुपारी १२ ते १ यावेळेत पू. स्वामी श्री दंडी महाराज यांचे प्रवचन आणि देणगीदारांचे सत्कार, दुपारी १.३० ते ३.३० महाप्रसाद, दुपारी ४ ते रात्री १०.१५ भजने, रात्री १०.३० वाजता कोंढे (चिपळूण) येथील श्री आई माऊली नाट्यनमन मंडळाचे बहुरंगी नमन होईल.

१० मे रोजी सकाळी ८ ते दुपारी २ नवचंडी याग, गावातील देणगीदारांचा सत्कार, दुपारनंतर कीर्तन आणि त्यानंतर ग्रामस्थांची भजने होतील. विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम होणार आहेत. सर्व कोतवडेवासीय, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्थ, माहेरवाशिणी, भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ‘पब्लिक देवस्थान ट्रस्ट, कोतवडे’च्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!