मुख्य बातमी

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे गुणवंत मराठा विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त अशा कार्यक्रमांचे आयाजन केले जाते. इयत्ता दहावी व बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते, हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता, माळनाका येथील देसाई बॅंक्वेट हॉल येथे होणार आहे.

याकरिता मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, नुकताच दहावी, बारावीचा निकाल लागला आहे. २०२४-२५ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षला ८५ टक्के अथवा अधिक गुण आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारीप्रमाणे) मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यपत आणि शाळा सोडल्याचा दाखला सत्यप्रत अथवा कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे लिव्हिंग सर्टिफिकेटची सत्यप्रत दि. १ जूनपर्यंत दुपारी १ ते संध्याकाळी ५ या वेळेत (सोमवार व शासकीय सुटीचे दिवस सोडून) मंडळाच्या बेसमेंट स्टोअर क्र. ३, बी विंग, सिध्दिविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी या कार्यालयात जमा करावी. किंवा 7887490856 किंवा 8552031997 या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावी, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!