मुख्य बातमी
आबलोली गावचे माजी सरपंच तुकाराम (दादा) पागडे यांचे निधन

आबलोली : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोलीचे माजी सरपंच तसेच आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आधारस्तंभ तुकाराम (दादा) गुणाजी पागडे यांचे १६ मे रोजी सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराचा तीव्र धक्याने वयाच्या ६५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने आबलोली पंचक्रोशीसह संपूर्ण गुहागर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. तुकाराम (दादा) गुणाजी पागडे यांनी कोरोना काळात सरपंच म्हणून केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, मुलगी, जावई,भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दादा पागडे यांचे दशक्रिया व बारावे २५ मे रोजी असा होणार आहे.



