क्रीडामुख्य बातमी

कोतवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडेचा विद्यार्थी सोहम सुनील रांबाडे याने तालुकास्तरीय ३०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे.

या निमित्ताने कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या वतीने सोहम रांबाडे याचा पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संजय मयेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, संस्थेचे उपखजिनदार सूर्यकांत कांबळे, कार्यकारणी सदस्य रोशन कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, क्रीडा शिक्षक श्री. खुळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हास्तरावर चिपळूण या ठिकाणी तो सहभागी होणार असल्यामुळे सर्व उपस्थितांनी या विद्यार्थ्याला शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!