क्रीडामुख्य बातमी

जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आज उदय सामंत यांच्या हस्ते 

श्री मारुती - गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजन

रत्नागिरी : श्री मारुती – गणपती पिंपळपार देवस्थान, टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शताब्दी महोत्सवानिमित्त २७ ते २९ जून या कालावधीत टिळक आळीतील भगिनी मंडळ हॉलमध्ये टिळक आळी शतक महोत्सव जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा या नावाने रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२५-२६ आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज (२७ जून) दुपारी २.३० वाजता होणार आहे.

ही स्पर्धा १ पुरुष एकेरी, २ पुरुष दुहेरी, ३ महिला एकेरी, ४ व्ययस्कर गट पुरुष, ५ कुमार गट, ६ कुमारी गट ७ किशोर गट व ८ किशोरी गट अशा आठ गटात खेळवली जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून श्री साई प्रकाश कानीटकर , मंदार दळवी व श्री सागर कुलकर्णी तसेच स्पर्धा प्रमुख म्हणून मनोहर केळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शशिकांत काळे, विश्वस्त अरुण करमरकर, विश्वस्त मंदार खेर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज, सचिव मिलिंद साप्ते, खजिनदार नितीन लिमये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!