मुख्य बातमीशैक्षणिक

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात व्होकेशनल अभ्यासक्रमांचे प्रवेश ऑफलाईन पद्धतीने सुरू

रत्नागिरी : चालू शैक्षणिक वर्षापासून अकरावीचे संपूर्ण राज्यातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने तर एम.सी.व्ही.सी. (एच.एस.सी. व्होकेशनल) अभ्यासक्रमाचे प्रवेश जुन्या पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने सुरु आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्या चार शाखा असून विज्ञान, वाणिज्य कला आणि एम.सी.व्ही.सी. शाखांचा यामध्ये समावेश आहे. सन १९८८-८९ पासुन संपूर्ण राज्यात एचएससी व्होकेशनल शाखेमध्ये वाणिज्य, कृषी, तांत्रिक, डेअरी, मस्त्य, पॅरामेडिकल यासह सहा गटात ३० विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. व्यवसायाभिमुख व प्रात्यक्षिकावर भर देऊन कौशल्य प्राप्त शिक्षण देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असून, बारावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेशही मिळतो. या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराचीही संधी मिळालेली आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम विद्यार्थीप्रिय ठरले आहेत.

अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे एम.सी.व्ही.सी.चे खालील कोर्सेस सुरू आहेत. यामध्ये Accounting and Office Management (Commerce Group), Logistic and Supply Chain Management (Commerce Group); Medical Lab Technology (Paramedical Group), Electronics Technology (Engineering Group) यासर्व अभ्यासक्रमांसाठी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे थेट प्रवेश देण्यात येणार असून फक्त महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज akjcrtn.ac.in या वेबसाईटद्वारे भरावयाचा आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी वेबसाई पहावी किंवा महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!