मुख्य बातमी

कोकण रेल्वेचे सीसीटीव्ही चोरीचा प्रयत्न; दोघांना अटक

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील कोकण रेल्वेच्या टिव्हीसीआरच्या (टनेल व्हेंटिलेशन कंट्रोल रुम) डीजे रूमचे कुलूप तोडून सीसीटीव्ही चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांच्या रेल्वे पोलिसांनी ४८ तासांत मुसक्या आवळल्या. चोरीचा हा प्रयत्न १ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० ते १ वाजण्याच्या सुमारास घडला होता.

रफिक महंमद खान (वय २९, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) आणि साहिल संजय जाधव (वय २९, रा. पोलीस लाईन, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. शनिवारी दुपारी या दोन्ही संशयितांनी करबुडे येथील टिव्हीसीआरच्या डीजे रुमच्या शटरचे कुलूप तोडले. त्यानंतर अनधिकृतपणे त्या रूममध्ये प्रवेश करत सीसीटीव्ही केबल तोडली आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या ४८ तासांच्या आत त्या दोन्ही संशयतांना अटक केली.

त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांची सुटका करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!