रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डी.फार्मसीच्या रिक्त जागांसाठी २९ ऑक्टोबरला संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) चौथ्या फेरीअखेर रिक्त राहिलेल्या जागांसाठी पोस्ट एचएससी डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharmacy) या अभ्यासक्रमाची संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया २९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास ही प्रक्रिया दि. ३० ऑक्टोबर रोजीही सुरू राहील, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रवेश प्रक्रिया दोन्ही दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना संस्थेच्या www.gpratnagiri.org या अधिकृत संकेतस्थळावर तसेच संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येतील.
दरम्यान, या समुपदेशन फेरीस (Counselling Round) केवळ उपस्थित राहिल्याने प्रवेशाची खात्री मिळत नाही; उपलब्ध जागा व गुणवत्तेनुसारच नियमानुसार प्रवेश निश्चित केले जातील, असेही शासकीय तंत्रनिकेतन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


