मुख्य बातमी

पर्यावरण दिनानिमित्त नाचणे भाजपातर्फे वृक्षारोपण

रत्नागिरी : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज (५ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्य मंडल, रत्नागिरी भाजपा (द) मधील नाचणे पंचायत समितीमधील भाजपा कार्यकर्त्यांनी नाचणे येथे वृक्षारोपण केले.

यावेळी नाचणे ग्रामपंचायत सदस्य संकेत कदम आणि सौ. दीप्ती फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जेष्ठ कार्यकर्ते सुनील आडिवरेकर, बुथ अध्यक्ष विजय सुर्वे, समीर सावंत, सुनील नाचणकर, राकेश कदम, अरविंद मोरे, मुन्ना पाटकर, दिलीप घडशी, संदीप सुर्वे, ओंकार फडके उपस्थित होते.

या वृक्षारोपणासाठी झाडे ग्रामपंचायत सदस्या सौ. दीप्ती फडके यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली होती. नाचणे गावातील ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल नाचणे भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!