मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

निगुंडळ ग्रामदेवता मंदिर परिसरात वृक्षलागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

गुहागर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील निगुंडळ ग्रामपंचायतीच्या वतीने ५ जून रोजी निगुंडळ ग्रामदेवता मंदिर परिसरात वृक्षलागवड करण्यात आली.

यावेळी बोलताना पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी आपण प्रत्येकाने १०० जरी झाडे लावायचा संकल्प केला, तर वसुंधरेचे रक्षण होवू शकेल, असे सांगितले. महाराष्ट्र शासनाने ५ वर्षांत माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जल, भूमी, वायू, अग्नी, आकाश या थीमवर काम करून वसुंधरेची रक्षण करण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ग्रामदेवता मंदिर परिसरात फुलझाडे लावून मंदिराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल, असा विश्वासही यावेळी श्री. केळस्कर यांनी व्यक्त केला.

यावेळी ग्रामदेवता मंदिर परिसरात सोनमोहर, बहावा, सुरंगी, सोनचाफा अशी विविध फुलझाडांची लागवड करण्यात आली.

या प्रसंगी माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी यावेळी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाबाबतची माहिती दिली.

ग्रामपंचायत निगुडंळ सरपंच सौ. दीप्ती गिजे, उपसरपंच सुभाष गावडे, कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी शरद भांड, कृषी विस्तार अधिकारी कृष्णदेव कदम, माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्या पालक तांत्रिक अधिकारी नयना जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सौ. साक्षी गोरे, कृषी सहाय्यक अमित शेळके, तसेच ग्रामपंचायत सदस्य मयुरेश भागवत, अंकुश पिलवलकर, सौ. सुवर्णा गावडे, सौ. मनीषा पवार व ग्रामदेवता मंदिराचे मानकरी अशोक भागवत काका, ग्रामदेवता कमिटीचे सदस्य संतोष धामणस्कर, पोलीस पाटील प्रकाश आंबोकर व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी अंगणवाडी सेविका लीलावती भुवड, अपूर्वा कानेकर, मदतनीस सुवर्णा समगिसकर, काजल चाळके, आशा सेविका अमृता मुकनाक, ग्रामपंचायत कर्मचारी परशुराम मुकनाक, डाटा ऑपरेटर सौ. धनश्री समगिस्कर, युवा प्रशिक्षणार्थी सौ. सिद्धी चव्हाण व निगुंडळ गावचे ग्रामस्थ वसंत मुकनाक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!