मुख्य बातमी

दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नाचणे, निवळी, हातखंबा, झरेवाडी येथे जनजागृती

रत्नागिरी : दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ग्रामपंचायत नाचणे, निवळी बाजारपेठ, निवळी तिठा रिक्षा स्टँड, हातखंबा रिक्षा स्टँड झरेवाडी, पावस बसस्थानक, ग्रामपंचायत गोळप, एमआयडीसी रत्नागिरी व मिरजोळे येथे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला.

या दरम्याने शासकीय लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक वृत्तपत्र, केबल टीव्ही व आकाशवाणीद्वारे भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले. तसेच सोशल मीडियाद्वारे व्हॉट्सॲप ग्रुपवर भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृतीपर संदेश प्रसारित करून तक्रारीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी (०२३५२-२२२८९३) आणि टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास अविनाश पाटील, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, (७५८८९४१२४७), मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक, लाप्रवि (९८७०४७४५३५), सुहास रोकडे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, (९०६७०३५९१०) यांना संपर्क साधावा अथवा acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर acbmaharashtra.net येथे किंवा ई-मेल आयडी acbratnagiri@gmail.com, dyspacbratnagiri@mahapolice.gov.i, फोन नं. ०२३५२-२२२८९३ आणि टोल फ्री क्रमांक १०६४ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!