आदित्य महेंद्र मोहिते याची कोकण रेल्वे मध्ये स्टेशन मास्टरपदी निवड

आबलोली (संदेश कदम) : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आदित्य महेंद्र मोहिते याची कोकण रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पदावर नुकतीच निवड झाली.
केंद्र शासनाच्या माध्यमातून सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तसेच या पदासाठी घेण्यात येणाऱ्या विविध निकषांमध्ये आदित्य मोहिते याने उज्ज्वल यश संपादन केले. या यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार व सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी आदित्यचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांनी आदित्यचा सत्कार करत त्याचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी महाविद्यालयाचे कृषी विभाग प्रमुख डाॅ. हरिश्चंद्र भागडे, आदित्यचे आई वडील व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.



