मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
ग्रामपंचायत मुंढर येथे वृक्षलागवड

गुहागर : ग्रामपंचायत मुंढर कातकिरी अंतर्गत मुंढर खुर्द वळवणवाडी येथील क्षेत्रफळ देवस्थान ते अंतर्गत रस्त्याला दुतर्फा विविध प्रकारची १५० झाडांची लागवड करण्यात आली.
मुंडर खुर्द प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ यांच्या वतीने वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले होते. तसेच वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे, सामाजिक वनीकरण विभागाचे श्री. निमकर श्री. गायकवाड, श्री. पवार, सरपंच सौ. अमिषा गमरे, सौ. भक्ती धनावडे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप अवेरे, रवींद्र चिले, पोलिस पाटील किरण धनावडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




