मुख्य बातमी
रत्नागिरी युवा सेनेच्यावतीने दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

रत्नागिरी : युवा सेनेच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवारी (१५ जून) सकाळी १० वाजता माळनाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात होणार आहे.
रत्नागिरी शहर व रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन युवा सेनेचे तालुकाप्रमुख तुषार साळवी आणि शहर प्रमुख अभिजीत दुडये यांनी केले आहे.



