मुख्य बातमी
उमेश कुळकर्णी यांच्याकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वागत

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष, कोकणचे नेते, माजी बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण आज (१७ जून) रत्नागिरी दौऱ्यावर असताना माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार विनय नातू यांच्यासह रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.



