मुख्य बातमी

नवोदय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कोतवडे हायस्कूलमध्ये सत्कार 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलमधील नवोदय परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समितीचे अध्यक्ष नरेश कांबळे यांच्या हस्ते आज करण्यात आला.

डिसेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या नवोदय परीक्षेमध्ये कोतवडे इंग्लिश स्कूलमधील शाळेतील इयत्ता पाचवीतील चार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात वेदिका जितेंद्र थेराडे (८३.७५ टक्के), यश प्रदीप भातडे (६५ टक्के), ईश्वरी महेश पवार (५५ टक्के) आणि आराध्या नितेश कांबळे (४७.५० टक्के) या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.

यावेळी विभागाचे प्रमुख श्री. खरात व मार्गदर्शिका अवनी शितूत यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, ज्येष्ठ शिक्षक सुरेश नाईक, ज्येष्ठ शिक्षिका सौ. शिल्पा सुर्वे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!