मुख्य बातमीराजकारणशैक्षणिक

सक्तीची “हिंदी नकोच”

राज आदेशाची रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिकांकडून अंमलबजावणी

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश आणि पत्र घेऊन लगेचच शहरातील महत्त्वाच्या शाळांना मनसे रत्नागिरीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन येथील मुख्याध्यापकांनी, शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि हिंदी शिकवण्यास विरोध करावा, असे निवेदन दिले.

इयत्ता पहिलीपासून तिसरी सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाची रत्नागिरीत अंमलबजावणी करण्यासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण, शहर संघटक अमोल श्रीनाथ या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यस्थापनांना निवेदन देण्यात आले असून या हिंदी सक्तीला मनसे बरोबरच मराठी माणूस म्हणून शिक्षक तसेच पालक वर्गाने देखील याला विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विभाग अध्यक्ष राहुल खेडेकर, सोम पिलनकर, रोहन शेलार, ॲड. माधवी पालकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाचे पत्र रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूल, सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूल, विसपुते इंग्लिश मीडियम स्कूल आदी शहरातील प्रमुख शाळांना निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!