मुख्य बातमीशैक्षणिक

बियाणी बालमंदिर, भिडे आजी खेळघराची पालक सभा

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या गोदावरीदेवी भवरीलाल बियाणी बालमंदिर, भिडे आजी खेळघरमध्ये एकत्रित पालक सभा घेण्यात आली. ध्येय गीताने सभेची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. धनश्री मुसळे यांनी केले.

मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या कार्यकृती, बालमंदिरचे दैनंदिन नियोजन या बाबतची माहिती सौ. अपर्णा गोगटे यांनी सांगितली. महत्त्वाचा टप्पा म्हणजे संस्था, शाळा, शिक्षक, पालक यांना जोडणारा दुवा म्हणजे पालक प्रतिनिधी मंडळ यांच्या कार्याची माहिती सौ. नार्वेकर यांनी दिली. वर्गवार पालक प्रतिनीधींची निवड करण्यात आली. यामध्ये ऋचा जुवेकर, निधी खेर, अक्षदा कांबळे, पुनम तेंडुलकर, तानाजी वाघमारे, अम्रिता वारंग, मानसी गराटे, प्रिया वायंगणकर, सायली साळवी, शमिका भरणकर, समिरा बेंद्रे, श्रेया पटवर्धन, अक्षरा नागले, उमेश जोशी, अक्षय तोंडवळकर, धनश्री जोशी, प्रवीण साळुंके, वेदा पडेलकर, शुभ्रा करळकर, प्राची बिर्जे, रुची घवाळी, पूजा खंडागळे, श्रावणी पेढे आदी पालक प्रतिनिधींचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.

प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी पालकांना शाळेत घेतले जाणारे हसत खेळत, आनंददायी शिक्षण याविषयी उत्तम असे मार्गदर्शन केले. सभेला सदस्य चंद्रकांत घवाळी, संतोष कुष्टे, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र कदम उपस्थित होते. सभेचे नियोजन बालमंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. धनश्री मुसळे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. आसावरी पावसकर यांनी केले. सौ. आयुषी विचारे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!