मुख्य बातमीशैक्षणिक

रा. भा. शिर्के प्रशालेत छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत छत्रपती शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. पवार, पर्यवेक्षिका सौ. काजरेकर तसेच शाळेतील शाळेतील शिक्षक उपस्थित होते. शाळेचे शिक्षक, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. रसाळ यांनी अत्यंत प्रभावी शैलीत महाराजांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. तत्कालीन समाजाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी महाराजांनी केलेल्या अनेकविध क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. रसाळ सरांनी विद्यार्थ्यांना अतिशय ओघवत्या शैलीत माहिती दिली. तसेच छत्रपतींच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून त्यांच्या सामाजिक कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.

त्यानंतर अध्यक्षीय भाषणात सौ. पवार यांनी रयतेच्या राजाचे वर्णन गोष्टी रूपाने करून सामाजिक न्याय दिनाचे महत्त्वही सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग व स्वराज्य सभा विभाग यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरित्या केले. सूत्रसंचालन सौ. डोईफोडे यांनी केले तर सौ. दूदगीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!