मुख्य बातमी
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा प्रवचन व दर्शन सोहळा २३ नोव्हेंबरला शृंगारतळीत

आबलोली (संदेश कदम) : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी दक्षिणपीठ नाणीज धाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांनी लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्यातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.


