मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
खेर्डी येथील डॉ. सोहम जाधव यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार

गुहागर (संदेश कदम) : खेर्डी (ता. चिपळूण) येथील डॉ. सोहम संतोष जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रातील फिजिओथेरपीस्ट (BPTH) पदवी संपादन केल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका चिपळूण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहीते, तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ, जिल्हा युवक अध्यक्ष ॲड. प्रशितोष कदम यांनी डॉ. सोहम जाधव यांचा जाहीर सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


