मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

तहसीलदारांच्या परवानगीने गाळ मोफत घेवून जाण्याचे आवाहन

चिपळूण : येथील वाशिष्ट नदीतून काढलेला गाळ ज्या शेतकऱ्यांना, नागरिकांना वैयक्तिक शेतीसाठी, कारणासाठी हवा आहे, अशांनी तहसीलदार चिपळूण यांची परवानगी घेवून मोफत घेवून जावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले आहे.

वाशिष्ट नदीतील गाळ काढण्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी ३ मे रोजी आढावा घेतला. चिपळूण शहराला पुराचा त्रास होवू नये यासाठी नाम फौंडेशन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वाशिष्ट नदीतून गाळ काढण्यात आला आहे, अजूनही काढण्यात येत आहे. हा काढलेला नदीतील गाळ ज्या शेतकऱ्यांना शेतकामासाठी वा ज्या नागरिकांना भर म्हणून वैयक्तिक कामासाठी हवा आहे, त्यांनी तहसीलदार चिपळूण यांची परवानगी घेवून तो मोफत घेवून जावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!