मुख्य बातमीशैक्षणिक

कुवारबाव येथील जागुष्टे हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार 

रत्नागिरी : श्रीमती जागुष्टे हायस्कूलमध्ये सन २०२५ -२५या शैक्षणिक वर्षांमध्ये विविध बाह्य स्पर्धा परीक्षा आणि मार्च एसएससी परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पाटबंधारे विभाग, रत्नागिरीचे उपविभागीय अभियंता वसंत तिरमारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. जोशी, संस्थेचे सहसचिव श्री. लेले, श्री. गोकटे, प्रशालेचे व्यवस्थापक श्री. आग्रे आदी मान्यवर, पालक व माजी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. झोरे यांनी प्रस्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर चंद्रकांत पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व नंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावर्षी प्रशालेचा निकाल ९६.३६ लागला. यामध्ये एसएससी परीक्षेत पुढील प्रमाणे प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ज्ञानदा उत्तम काटकर (९७.६० टक्के, प्रथम क्रमांक), मयुरी भाऊसो गडदे (९२.६० टक्के द्वितीय क्रमांक), तन्वी दिलीप लाखण (९१.४० टक्के व साईराज राजेंद्र चव्हाण (९१.४० टक्के तृतीय क्रमांक विभागून)

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी ज्ञानदा काटकर, सौ. रेखा पटवर्धन, प्रमुख पाहुणे वसंत तीर मारे, अध्यक्ष श्री. जोशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक सुनील जाधव यांनी केले आणि आभार अनंत जाधव यांनी मानले.

या संपूर्ण कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. झोरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!