मुख्य बातमी
जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक २८ जुलै रोजी

रत्नागिरी : माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. काही अपरिहार्य कारणास्तव बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता २८ जुलै रोजी दुपारी १ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात होणार आहे.
ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.



