कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

म्हसळ्यात आज लोकमान्य टिळक यांची १६९ वी जयंती साजरी

म्हसळा : शहरातील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची १६९ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतमातेच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थितानी अभिवादन केले.

३५० वर्षांनंतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीने जर्जर झालेल्या भारतीयांच्या मनात “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” ही हृढनिश्चयी घोषणा रुजवून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला राजमातेच्या मंत्राचे पुन:स्मरण करून दिले. ब्रिटिशांच्या जुलुमाने गलीतगात्र आणि विखुरलेल्या देशाला पुन्हा एकदा संघटित केल्याच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. तसेच वाचनालयातील शतसुर्याचे तेज, श्रीधर बळवंत टिळक, लोकमान्य टिळक, महाराष्ट्रांतील समाज सुधारक, निवडक चरित्रे, महापुरुषांची महायात्रा, थोर नेत्यांची ओळख, ह्यांनी महाराष्ट्र घडविला, १०५ श्रेष्ठ मानव, चित्र चरित्र अशी अनेक पुस्तके हाताळली.

यावेळी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सुनील गोडगे, सुशील गाडगे, अशोक सानप, नीलेश यादव, खंडू मोहळकर, अधिराज गायकवाड, प्रदीप शिरतोडे, राहुल झडे, परशुराम नाक्ती, प्राची मेंदडकर आदी संचालक, कर्मचारी, वाचक उपस्थित होते. तालुक्यातील बहुतांश प्राथमिक माध्यमिक शाळा, शासकीय कार्यालयांतून लोकमान्य टिळकांची जयंती साजरी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!