कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

जनतेच्या कराचे ७० लाख रुपये बुडवले

बेकायदेशीर टर्फला टाटा पॉवरची व मध्य रेल्वेची परवानगी नाही : आम आदमी पार्टी आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याची मागणी

अलिबाग (राजेश बाष्टे) : खोपोली नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहा येथील शाळेसमोरील मैदानावर खोपोली नगरपालिकेमार्फत क्रिकेटचे टर्फ बनवण्याचे काम सुरू आहे. या मैदानावरून टाटा पावर कंपनीची व मध्य रेल्वेची एक लाख दहा हजार व्होल्टची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून ही टर्फ बनवण्यासाठी टाटा पॉवर व मध्य रेल्वेची कोणतीही परवानगी नगर पालिकेने घेतलेली नाही. हे टर्फ बेकायदेशीर आहे व त्यासाठी नगर पालिकेने खर्च केलेले सर्व पैसे हे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांच्याकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टी खोपोलीचे शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

नागरिकांच्या कराच्या पैशांचा गैरवापर केल्याबद्दल खोपोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करण्यात यावे. त्यासाठी आम आदमी पार्टी आक्रमक झालेली असून, गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!