अविनाश जोशी यांचा सेवानिवृत्ती सोहळा पालकमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

रत्नागिरी : माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ, धामणसे हायस्कूल येथील मुख्याध्यापक अविनाश जोशी यांच्या सेवानिवृत्ती सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी ना. उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ऋणानुबंध स्मरणिकेचं प्रकाशन देखील करण्यात आले. जोशी सरांचे भगव्याशी नाते हे जिव्हाळ्याचे आणि निष्ठेचे आहे. आता त्यांच्या आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होत आहे ती समाजसेवेची! त्यांची जिद्द, चिकाटी आणि सेवाभाव नव्या पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. गावाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी त्यांनी केलेले योगदान अमूल्य असल्याचे ना. सामंत यांनी या यावेळी सांगितले.
याप्रसंगी उमेश कुळकर्णी, मुकुंद जोशी, विलास पांचाळ, विश्वास धनावडे, अमर रहाटे, ऋतुजा उमेश कुळकर्णी, राजेश मुकादम, सतीश शेवडे, तारक शेठ मयेकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.



