मुख्य बातमी

भारतीय अस्मितेचा आविष्कार वंदे मातरम् : ॲड विलास पाटणे 

रत्नागिरी : “बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ कादंबरीत वंदे मातरम् ७ नोव्हेंबर १८७५ रोजी प्रसिद्ध झाले. भारतीय अस्मितेचा आविष्कार वंदे मातरम् रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनात गायले. हुतात्मा भगतसिंग, अनंत कान्हेरे यांसारखे क्रांतिकारक वंदे मातरम् म्हणत फाशी गेले. बंगालच्या फाळणीविरोधात वंदे मातरम् स्वातंत्र्यलढ्यात स्फूर्ती गीत म्हणून गायले गेले. राष्ट्राप्रती कायम अभिमान व अखंडता जागृत करणाऱ्या गीतास आपण अभिवादन करू,” या असे आवाहन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी याप्रसंगी केले.

सौ. श्वेता जोगळेकर व सौ. दीप्ती आगाशे यांनी सुरेल स्वरात सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम गीतामुळे वातावरण भारावून गेले.

याप्रसंगी ॲड. निनाद शिंदे, ॲड. अशोक कदम ॲड. विजय साखळकर ॲड. रुची महाजन, ॲड. नंदू गद्रे ,ॲड सचिन रेमणे, ॲड. शम्मी पडवेकर, ॲड. फजल डिंगणकर, ॲड. शशिकांत सुतार, ॲड. प्रशांत पाध्ये, ॲड. अतुल नवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!