मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोलीची १७ ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (१७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालय सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

या सभेला पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, संचालक पांडुरंग पाते, प्रदीप बेंडल, महादेव वणे, संदेश कदम, वैभव आदवडे, उदय गोरीवले, अमोल वाघे, श्रीमती वनिता डिंगणकर, सौ. श्रावणी पागडे, तज्ञ संचालक अनंत पागडे, संदीप पाष्टे, कार्यकारी संचालक अनिल घाणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!