पाचाड येथे गोठ्यात आढळला ९ फूट लांबीचा अजगर

चिपळूण : पाचाड येथे २० ऑगस्ट रोजी सहदेव चिले यांच्या गुरांच्या गोठ्यातील माळ्यावर ठेवलेल्या पेंढ्यामध्ये अजगर असल्याची माहिती त्यांनी वन विभागाला कळवली.
वन परिक्षेत्र अधिकारी, चिपळूण श्री. एस. एस. खान, वनरक्षक रामपूर राहुल गुंठे, वाहन चालक नंदकुमार कदम, सर्पमित्र प्रथमेश पवार तत्काळ या ठिकाणी पोहचून या अजगर जातीच्या सापाला सुरक्षित रेस्क्यू करून पकडले. या आजाराची लांबी अंदाजे ८ ते ९ फूट लांबी होती. हा अजगर सुस्थितीत आल्याची खात्री करून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) सौ. गिरिजा देसाई, सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी चिपळूण, वनरक्षक रामपूर राहुल गुंठे, सर्पमित्र प्रथमेश पवार, वाहन चालक नंदकुमार कदम यांनी पार पाडले.



