मुख्य बातमी
रत्नागिरीत २६ जून रोजी “कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा कार्यालयीन उपयोग” विषयावर कार्यशाळा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजन

रत्नागिरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून हा सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजता यावेळेत “कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन उपयोग” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे होणार आहे.
या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.


