देव, घैसास, कीर महाविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. इतिहास विभाग व आयक्यूएसी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमात माहेश्वरी नांदगावकर व पलक वधेरा यांनी मनोगत व्यक्त केले. साक्षी शितप हिने पोवाडा सादर केला. पोवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग उलगडले. त्यानंतर पूर्वा सुर्वे व शुभांगी पोटे यांनी शिवाजी महाराजांवर आधारित नृत्य सादर केले. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला शाखाप्रमुख ऋतुजा भोवड, विज्ञान शाखाप्रमुख प्रा. घाणेकर, इतिहास विभागप्रमुख प्रा. रिया बंडबे, इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा. रिया बंडबे यांनी केले. सूत्रसंचालन निलाक्षी राऊत हिने केले. श्रध्दा महाराणा हिने आभार मानले.



