जिल्ह्यात ५३ ठिकाणी समुदाय आरोग्य शिबिरे ; ३९ ठिकाणी नियोजन

रत्नागिरी : मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळात ५३ ठिकाणी समुदाय आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून ३९ ठिकाणी नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी श्री गणेश उत्सवानिमित्त ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य शिबिर आयोजित करण्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यासंदर्भात सार्वजनिक गणेश मंडळे आणि आरोग्य विभाग यांची बैठक घेतली होती. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत ९२ ठिकाणी समुदाय आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील ५३ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ही शिबिरे घेण्यात आली आहेत.
रत्नागिरी तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल, परकार हॉस्पिटल, श्री रामनाथ हॉस्पिटल, लायन्स हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय, राजापूर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय राजापूर, खेड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय कळंबणी, रॉयल हॉस्पिटल, घरडा हॉस्पिटल, परशुराम हॉस्पिटल, एसएमएस हॉस्पिटल, एमईएसएएम परशुराम रुग्णालय, मंडणगड तालुक्यात ग्रामीण रुग्णालय मंडणगड, देवरुखमध्ये ग्रामीण रुग्णालय देवरुख, दापोलीत उपजिल्हा रुग्णालय दापोली, योगिता दंत महाविद्यालय व रुग्णालय, लांजामध्ये ग्रामीण रुग्णालय लांजा, चिपळूणमध्ये लाईफकेअर हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, वालावलकर रुग्णालय यांच्या माध्यमातून ही समुदाय आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. जिल्ह्यातील ऊर्वरित ३९ ठिकाणी ही समुदाय शिबिरे होणार असून, त्याबाबत नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने देण्यात आली.



