मुख्य बातमी

शिर्के प्रशालेच्या गुरुकुलमध्ये शिक्षकदिन साजरा

रत्नागिरी : सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्ताने गुरुकुलमध्ये आजचा दिवस स्वयंशासन दिन म्हणून साजरा केला गेला.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुकुलातील शिक्षकांची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. यावेळी या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते नववी या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. स्वयंशासन दिनाच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिजीत गोडबोले लाभले होते. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अभिजीत गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना स्वतःला आलेल्या अनुभवातून अनेक गोष्टींचे सुंदर मार्गदर्शन केले. दहावीची परीक्षा किती महत्त्वाची आहे व त्यानंतर आपल्या करिअरची दिशा आपण कशी निवडावी याविषयीचे बहुमोल मार्गदर्शन सुद्धा त्यांनी आपल्या भाषणामध्ये केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. के. डी. कांबळे यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे महत्व किती आहे हे मुलांना या निमित्ताने पटवून दिले.

विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापक बनलेला कु. चैतन्य व कु. मीरा यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गुरुकुल प्रमुख श्री. किरण दादांसह गुरुकुल चे सर्व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संघश्री कांबळे हिने केले तर कु. मीरा ने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!