मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

केळशी किनाऱ्यावरून चार लाखांचा अमली पदार्थ जप्त

दापोली : तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरात दापोली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत तब्बल चार लाख रुपयांचा चरस साठा जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अब्रार इस्माईल डायली (वय ३२) यांच्या राहत्या घराच्या मागील पडवीत तपासादरम्यान ९९८ ग्रॅम चरस सापडला. हा माल गडद लाल-सोनेरी रंगाच्या प्लास्टिकच्या वेष्टनात, आत हिरव्या रंगाच्या पॅकिंगमध्ये ठेवलेला होता. चरसला तपकिरी रंग व तीव्र वास असून, वेष्टनावर इंग्रजीत “6 GOLD” असे तसेच कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला. पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीत हा मुद्देमाल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, पीएसआय यादव, पीएसआय पाटील, हेडकॉन्स्टेबल मोहिते, हेडकॉन्स्टेबल ढोले, कॉन्स्टेबल भांडे, टेमकर, दिंडे, तसेच एल.पी.सी. पाटेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या प्रकरणी दापोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीवर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!