मुख्य बातमीशैक्षणिक

राष्ट्रीय हिंदी दिन वक्तृत्व स्पर्धेत नीलाक्षी राऊत प्रथम

रत्नागिरी : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात हिंदी विभाग तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात नीलाक्षी राऊत (प्रथम वर्ष कला शाखा, वरिष्ठ महाविद्यालय) हिने प्रथम क्रमंक पटकावला. द्वितीय माधुरी शिंदे (अकरावी कला शाखा, कनिष्ठ महाविद्यालय) आणि तृतीय प्रांजली धनावडे (अकरावी कला शाखा, कनिष्ठ महाविद्यालय) हिने मिळवला.

शुभांगी पोटे हिने सरस्वती वंदना सादर केली. हिंदी विभागप्रमुख प्रा. प्रियांका कुंभार यांनी हिंदी भाषेचे महत्व व विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीक्षम जीवनातील तिची भूमिका स्पष्ट केली. या स्पर्धेत कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धकांना विविध विषय देण्यात आले होते, ज्यावर त्यांनी आत्मविश्वासाने, स्पष्टतेने व प्रभावी शैलीत आपले विचार मांडले.

या वेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. मधुरा पाटील, उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या प्रमुख प्रा. राखी जाधव, कला शाखाप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, हिंदी विभागप्रमुख प्रा. प्रियांका कुंभार, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलाक्षी राऊत हिने केले. पूर्वा सुर्वे हिने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!