मुख्य बातमीशैक्षणिक

पटवर्धन हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूल येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोककवी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.

शाळेचे शिक्षक सचिन मोहिते यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी टिळक व साठे यांचे कार्य, विचार आणि सामाजिक योगदान यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांनी लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या सामाजिक जाणीवेवर आधारित मनोगते व्यक्त केली.

या दिवशी नगर पालिकेच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभाग प्रमुख श्री. वाडकर आणि मराठी विषय शिक्षिका श्रीमती हर्डीकर यांनी केले.

सूत्रसंचालनाची जबाबदारी शाळेच्या तिर्था मयेकर व रमा कानविंदे या विद्यार्थिनींनी अतिशय प्रभावीपणे पार पाडली. आभार प्रदर्शन आठवी या वर्गातील सना होरंबे या विद्यार्थिनी पार पाडले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करून करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!