मुख्य बातमी

आर्मी मेडीकल कोर आणि कॉलेज लखनऊ येथे भरती

२० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : आर्मी मेडीकल कोर आणि कॉलेज लखनऊ येथे ४ नाव्हेंबर ते ९ नाव्हेंबर या कालावधीत हेडक्वॉटर्स युनीट कोटा मधून Sol Tech (Nur Asst) या पदासाठी भरती होणार आहे. या भरतीमध्ये युद्ध विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांसाठी तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्याकरिता सैन्य भरती आयोजित केली आहे. यासाठी आपला अर्ज २० ऑक्टोबरपर्यंत uhq2025@joinamc.in या लिंकवर करावा.

इच्छुक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे पाल्यांनी तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्य यांनी भरतीसाठी आयोजित दिनांक रोजी सकाळी ५ वाजता आर्मी मेडीकल कोर आणि कॉलेज लखनऊ येथे आवश्यक कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!